Posts

Showing posts from June, 2020

रामायण व महाभारत खरंच घडले आहे की फक्त कथा आहेत?

Image
रामायण व महाभारत खरंच घडले आहे की फक्त कथा आहेत?  राऊत ,  इतिहासप्रेमी, जागतिक इतिहास अभ्यासण्यात विशेष अभिरुची 2019 M11 22 अपडेट केले मी फक्त महाभारताबद्दल लिहणार आहे आणि ते घडले होते हे सिद्ध करणारे काही पुरावे देणार आहे. महाभारताचे युद्ध कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर लढले गेले हे सगळ्यांनाच माहित असेल. हे स्थान सध्याच्या हरियाणा राज्यामध्ये आहे. हस्तिनापुरच्या सिंहासनासाठी हे युद्ध लढले गेले होते. हस्तिनापूर सध्याच्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. १९५२ साली पुरातत्व विभागाने ह्या ठिकाणी केलेल्या उत्खननात विदुराचे महल, द्रौपदीचे स्वयंपाकघर, तांब्याची भांडी, लोखंडी वस्तू, सोन्याचांदीचे दागदागिने, जुगारासाठी वापरण्यात आलेल्या कवड्या अशा अनेक महत्त्वाच्या वस्तू आढळून आल्या. हस्तिनापुरमध्ये करण्यात आलेल्या उत्खननात असे आढळून आले की ह्या ठिकाणी लोखंडी वस्तू बनविण्याची मोठी बाजारपेठ अस्तित्वात होती. तसेच १३५ वेगवेगळ्या लोखंडी वस्तू आढळून आल्या ज्यामध्ये तुटलेले बाण, सुऱ्या, कुऱ्हाडी, इ. चा समावेश होता. तसेच ह्या भागात शेती आणि पाळीव जनावरे ह्यावर चालणारी एक मोठी अर्थव्यवस्था अ...

रामायण खरंच घडल्याचे काही पुरावे आहेत का? (शब्दशः प्रत्येक काल्पनिक घटना नाही तर युद्ध व राम नामक व्यक्तीबद्दल पुरावे काय आहेत)

Image
हो, रामायण घडल्याचे अनेक पुरावे सापडतात. ह्या उत्तरात मी ते देणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे महाभारताप्रमाणे रामायणातील शहरे आणि वस्तू ह्या उत्खननात शोधणे अवघड असल्यामुळे ते घडले होते हे सिद्ध करण्यासाठी थोडा वेगळा मार्ग अवलंबावा लागतो. फोटो स्रोत - गूगल वाल्मिकी ऋषी आणि राम हे दोघेही समकालीन होते. रामायणामध्ये वाल्मिकींनी असे नमूद केले आहे कि त्यांनी रामायणातील घटनांचा आधी अभ्यास केला आणि नंतर रामायण लिहले. तसेच श्री रामाने त्यागल्यानंतर सीता मातेने काही काळासाठी वाल्मीकींच्या आश्रमामध्ये आश्रय घेतला होता. त्यामुळे तिच्याकडून काही घटनांचा तपशील वाल्मिकींना नक्कीच समजला असेल. रामायणामध्ये वाल्मिकींनी रामाच्या मागच्या ७३ पिढ्यांची माहिती अगदी तपशीलवार दिली आहे. तसेच त्यांच्या कुळातील कोणत्या पूर्वजाने कोणाशी लग्न केले ह्याची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. ह्याव्यतिरिक्त सीता मातेच्या पूर्वजांची माहिती पण देण्यात आली आहे. जर वाल्मिकींना एखादी पुराणकथा लिहायची असती तर एवढा तपशील देण्याचा खटाटोप का केला असता? हिंदू धर्म सोडून इतर धर्मातील असे अनेक देव आहेत ज्यांच्या म...

महाराजांच्या पराक्रमाला चूक बरोबरच विशेषण लावणं हे "पातकंच"!

महाराजांच्या पराक्रमाला चूक बरोबरच विशेषण लावणं हे "पातकंच"! त्यांनी जे केलं ते त्यांना बरोबर,योग्य वाटलं म्हणूनच, पण त्याला स्वार्थाचा लवलेशसुद्धा नव्हता. ज्या वेळेस परकीय आक्रमणाखाली अखंड भारत भरडला जात होता त्या वेळेस त्यांनी मूठभर मावळ्यांसोबत या असुरी शक्तींना तोंड द्यायचं ठरवलं यात चूकीच ते काय ? आणि कसे ? सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाऱ्यासारख्या वावरणाऱ्या आणि वाघासारख्या काळजाच्या लोकांमध्ये अस्मितेचं स्फुल्लिंग चेतवणं याचे चुकीत काय मोजमाप करायचे. आपण आता अखंड धर्मनिरपेक्षता म्हणतो ती ते नसते तर बघायचं सोडाच काय असते तेही कधी माहिती झालं नसत. भारत भू चा भाग असण्याऐवजी आपणही आता त्या हिरव्या कापडावरच्या चंद्रकोरीचे मिंधे झालो असतो. त्यांनीच तर देव देश आणि धर्म म्हणजे नेमके काय ते नुसतेच सांगितले नाही तर रक्तात एवढे भिनवले की अजूनही आपण "मराठी" गरज पडेल त्यावेळीसच नाही तर अखंड देशहिताचाच विचार करतो. महाराजांच्या पराक्रमाची महती एवढी की अजूनही भारतभरात महाराष्ट्र ओळखला जातो तो पराक्रमी आणि देव देश धर्माला वाहून घेतलेले लोक म्हणून ही काय कमी आहे की त्याची गोळाब...

"शिवाजी महाराज यावे जन्माला, पण आपल्या नाही शेजारच्या घरात."

Image
महाराष्ट्रात एक म्हण आहे 100 वर्षांपासून , "शिवाजी महाराज यावे जन्माला, पण आपल्या नाही शेजारच्या घरात." 365 किल्ल्यांची एक ढाल बनवून काही हजारांची फौज घेऊन तीनही शाह्याना (मुघल,आदिल, कुतुब),सिद्दी, इंग्रज,पोर्तुगिज ,डच,फ्रेंच याना अवघ्या 25 वर्षात उरावर घेऊन त्याना पळो की सळो सोडले ते आपल्या सारख्या स्वाभिमानी आणि प्रगतशील समाजाची निर्माण करावी म्हणून……. आपल्या चारित्र्यावर एकही डाग न घेणाऱ्या शिवाजी महाराजानाकाय माहीत ,आपण ज्या समाजासाठी झगडतोय तो पुढे जाऊन भ्रष्टाचाराच्या क्रमवारीत जगात पहिला असेल…अशी अपेक्षा त्यांनी बाळगली असेल ही त्यांची चूकच…. कल्याणच्या सुभेदाराची सुनेला लुगडी चोळी घेऊन मुलीप्रमाणे रवानगी करणाऱ्या ,शत्रूच्या स्त्रियांना हात काय नजर सुद्धा उचलायची नाही अशी ताकीद देणाऱ्या , तसेच बलात्कारी रांझे पाटील चे दोन हात दोन पाय तोडणार्या महाराजांना काय माहीत, ज्या समाजासाठी ते झगडले आहेत तो जगात बलात्काराच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थान मिळवेल,"निर्भया " सारखे गुन्हे करतील…असा खोटा आशावाद त्यांनी बाळगला असेल ही त्यांची चूकच…. 400 जहाजे निर्माण करून सिंधुदु...

शिवाजी महाराजांनी कोणत्या चुका केल्या आहेत का? असल्यास पुराव्यासह स्पष्ट कराल का?

Image
शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करताना असे लक्षात येते की त्यांनी त्यांच्या जीवनात फारच कमी चुका केल्या. प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी चूक केली तेव्हा ते त्यापासून शिकले आणि पुन्हा ती कधीही केली नाही. चूक का केली गेली आणि त्याचे कारण काय होते याचे विश्लेषण त्यांनी केले. पुरंदरचा तह पहिली चूक पुरंदरचा तह मिर्झा राजा जयसिंग यांच्याशी होता. ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी आपले ,२३ किल्ले (काही रेकॉर्ड १९ सांगतात) औरंगजेबाला दिले. त्यांनी त्याची मनसबदारी स्वीकारली आणि औरंगजेबाला भेटण्यास आग्रा येथे गेले ज्याच्या परिणामी शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवले कारण शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या वाढदिवशी संपूर्ण दरबारसमोर औरंगजेबाचा अपमान केला होता, परंतु ते तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी असा तह केला नाही. पन्हाळ्याची लढाई पन्हाळा किल्ल्याच्या बाबतीतही शिवाजी महाराजांनी आपले 1000 सैनिक गमावले आणि बरेच जखमी झाले. त्यांचे सेनापती नेताजी पालकर आणि त्यांच्यात काही गैरसमज होते. नेताजी काही कारणास्तव वेळेवर मजबुतीकरण प्रदान करू शकले नाहीत. त्यानंतर शिवाजी महाराजांनी पन्हाळा क...