रामायण व महाभारत खरंच घडले आहे की फक्त कथा आहेत?
मी फक्त महाभारताबद्दल लिहणार आहे आणि ते घडले होते हे सिद्ध करणारे काही पुरावे देणार आहे.
महाभारताचे युद्ध कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर लढले गेले हे सगळ्यांनाच माहित असेल. हे स्थान सध्याच्या हरियाणा राज्यामध्ये आहे. हस्तिनापुरच्या सिंहासनासाठी हे युद्ध लढले गेले होते. हस्तिनापूर सध्याच्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. १९५२ साली पुरातत्व विभागाने ह्या ठिकाणी केलेल्या उत्खननात विदुराचे महल, द्रौपदीचे स्वयंपाकघर, तांब्याची भांडी, लोखंडी वस्तू, सोन्याचांदीचे दागदागिने, जुगारासाठी वापरण्यात आलेल्या कवड्या अशा अनेक महत्त्वाच्या वस्तू आढळून आल्या.
हस्तिनापुरमध्ये करण्यात आलेल्या उत्खननात असे आढळून आले की ह्या ठिकाणी लोखंडी वस्तू बनविण्याची मोठी बाजारपेठ अस्तित्वात होती. तसेच १३५ वेगवेगळ्या लोखंडी वस्तू आढळून आल्या ज्यामध्ये तुटलेले बाण, सुऱ्या, कुऱ्हाडी, इ. चा समावेश होता. तसेच ह्या भागात शेती आणि पाळीव जनावरे ह्यावर चालणारी एक मोठी अर्थव्यवस्था अस्तित्वात होती असा निष्कर्ष काढण्यात आला.
प्रातिनिधिक फोटो (स्रोत - गूगल)
कुरुक्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या उत्खननात पण सुमारे ५,००० वर्षे जुने लोखंडी बाण सापडले आहेत. ह्याची दखल अनेक वृत्तवाहिन्यांनी घेतली होती आणि ह्याबद्दल डॉक्युमेंटरीज पण बनविण्यात आल्या आहेत.
मत्स्य आणि वायू पुराणानुसार गंगा नदीला आलेल्या एका मोठ्या पुरामुळे हस्तिनापुरचा विध्वंस झाला. एका संशोधनानुसार गंगेच्या खोऱ्यामध्ये ह्या पुराचे पुरावे अजूनही सापडतात.
श्रीकृष्णाची नगरी द्वारका ही सध्याच्या गुजरात राज्यामध्ये होती असे मानले जाते. ह्या ठिकाणी पण ५ हजार वर्षे जुन्या पूरातन वस्तू आढळून आल्या आहेत. तसेच समुद्रात बुडालेल्या द्वारकानगरीचे अनेक पुरावे पण आढळून आले आहेत.
महाभारतामध्ये अनेकदा इतिहास हा शब्द वापरला गेला आहे पण पुराण हा शब्द वापरला गेला नाही आहे. जर महर्षी व्यासांना पुराण कथा सांगायची असती तर त्यांनी निश्चितच पुराण हा शब्द वापरला असता.
महाभारतामध्ये भरत राजघराण्यातील राज्य करणाऱ्या ५० हुन अधिक राजांची नावे देण्यात आली आहेत. जर व्यासांना एखादी काल्पनिक गोष्ट सांगायची असती तर कथेची गरज म्हणून ५ ते ६ राजांची नावे पण देता आली असती.
महाभारतात वर्णन करण्यात आलेली ३५ हुन अधिक प्राचीन शहरे उत्तर भारतात आढळून आली आहेत आणि ह्या सर्व ठिकाणी उत्खननात पुरातन वस्तू आढळून आल्या आहेत.
असा एक मतप्रवाह आहे की महाभारत हे कवितेच्या स्वरूपात लिहले गेले आहे त्यामुळे ते काल्पनिक असू शकते. पण त्याकाळी सगळ्याच गोष्टी कवितेच्या स्वरूपात लिहिल्या जायच्या. अगदी गणितीय सूत्रे सुद्धा!
महाभारतात वर्णन केलेली ग्रह ताऱ्यांची स्थिती पण अचूक असल्याचे काही पुरावे आहेत त्यावरून ते काल्पनिक काव्य नाही आहे हे सिद्ध होते.
महाभारत युद्धात लढलेल्या सैनिकांच्या मृतदेहांचे काय झाले?
महाभारताबद्दल एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे असा की जर त्या युद्धामध्ये लाखो योद्धे लढले होते तर धारातीर्थी पडलेल्या योध्यांची हाडे किंवा हाडांचे सापळे का आढळत नाहीत. युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या मृतदेहांना हिंदू रितीरिवाजांप्रमाणे दहन करण्याची त्या वेळेला प्रथा होती. प्रत्येक दिवशी युद्धाच्या समाप्तीनंतर दोन्ही बाजूच्या मृत सैनिकांना अग्नी दिली जायची.
महाभारत घडले होते ही निश्चित! पण काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच काळानुरूप मूळ महाभारताच्या काव्यामध्ये अनेक गोष्टी मिसळल्या गेल्या असाव्यात. त्यातील दैवी चमत्कार, संहारक अस्त्रे ह्या गोष्टींवर भर देण्यापेक्षा पूर्ण घटनेकडे मानवीय दृष्टिकोनातून बघणे जास्त महत्वाचे आहे.
तळटीप - वर दिलेली माहिती ही अनेक ठिकाणाहून घेण्यात आली आहे.
तळटीपा
Comments
Post a Comment