Posts

Showing posts from July, 2020

इराकमध्ये नुकत्याच सापडलेल्या राम आणि हनुमान यांच्या भित्तिचित्रामागे काय रहस्य असेल? राम इराक ला गेल्याचे कुठे नमूद आहे का?

Image
इराकमधील एक भित्तिचित्र, भगवान राम आणि हनुमान यांची प्रतिमा असल्याचे म्हटले जात आहे. हे भित्तीचित्र इराकच्या पूर्वोत्तर भागातील होरेन शेखन डोंगर रांगेच्या खिंडीत एका खडकावर कोरलेले आहे. आणि साधारण ४५०० वर्षे जुने आहे. उत्तर प्रदेश ची एक संस्था 'अयोध्या शोध संस्थान' च्या मागणीवरून इराक मधील भारतीय राजदूत प्रदीपसिंग राजपुरोहित एका शिष्टमंडळासोबत या ठिकाणी भेट देऊन आले. आणि त्यांनी देखील या भित्तिचित्रांची पुष्टी केली. खालील चित्रामधे या भित्तिचित्रावरील आकृत्या स्पष्टपणे समजून घेता येतील. या चित्रात एक राजा दिसून येतो ज्याच्या हातात धनुष्य आहे आणि बाजूला बाण ठेवलेले दिसतात. त्याच्या कंबरेला एक कुऱ्हाड बांधलेली आहे. या राजाने एक पाय मूर्च्छित अवस्थेतील एका व्यक्तीच्या पोटावर ठेवलेला दिसतो तर एक वानर सदृश ठेंगणा व्यक्ती पायाशी बसलेला दिसून येतो. अयोध्या शोध संस्थेच्या म्हणण्यानुसार या आकृत्या प्रभू राम आणि हनुमान यांचे चित्र दर्शवितात. मात्र इराकचे पुरातत्व संशोधक या दाव्याला नाकारतात. त्यांचे म्हणणे आहे की, या आकृती मधील व्यक्ती म्हणजे तारदुन्नी नावाचा आदिवासी राजा आहे आणि त्याच्य...