इराकमध्ये नुकत्याच सापडलेल्या राम आणि हनुमान यांच्या भित्तिचित्रामागे काय रहस्य असेल? राम इराक ला गेल्याचे कुठे नमूद आहे का?

इराकमधील एक भित्तिचित्र, भगवान राम आणि हनुमान यांची प्रतिमा असल्याचे म्हटले जात आहे.

हे भित्तीचित्र इराकच्या पूर्वोत्तर भागातील होरेन शेखन डोंगर रांगेच्या खिंडीत एका खडकावर कोरलेले आहे. आणि साधारण ४५०० वर्षे जुने आहे.

उत्तर प्रदेश ची एक संस्था 'अयोध्या शोध संस्थान' च्या मागणीवरून इराक मधील भारतीय राजदूत प्रदीपसिंग राजपुरोहित एका शिष्टमंडळासोबत या ठिकाणी भेट देऊन आले. आणि त्यांनी देखील या भित्तिचित्रांची पुष्टी केली.

खालील चित्रामधे या भित्तिचित्रावरील आकृत्या स्पष्टपणे समजून घेता येतील.

या चित्रात एक राजा दिसून येतो ज्याच्या हातात धनुष्य आहे आणि बाजूला बाण ठेवलेले दिसतात. त्याच्या कंबरेला एक कुऱ्हाड बांधलेली आहे.

या राजाने एक पाय मूर्च्छित अवस्थेतील एका व्यक्तीच्या पोटावर ठेवलेला दिसतो तर एक वानर सदृश ठेंगणा व्यक्ती पायाशी बसलेला दिसून येतो.

अयोध्या शोध संस्थेच्या म्हणण्यानुसार या आकृत्या प्रभू राम आणि हनुमान यांचे चित्र दर्शवितात.

मात्र इराकचे पुरातत्व संशोधक या दाव्याला नाकारतात. त्यांचे म्हणणे आहे की, या आकृती मधील व्यक्ती म्हणजे तारदुन्नी नावाचा आदिवासी राजा आहे आणि त्याच्या पायाशी बसलेले लोक म्हणजे त्याचे गुलाम आहेत. या भित्तिचित्रांच्या बाजूला एक शिलालेख सुद्धा आहे ज्यात तारदुन्नीचे वर्णन केलेले आढळते.

जगातल्या कुठल्याही गोष्टीचा आपल्या संस्कृतीशी संबंध जुळल्यास शहानिशा न करता त्या गोष्टी मान्य करून आपण त्यावर विश्वास ठेवतो. मला हा त्यातलाच प्रकार वाटतो. फक्त काही आकृत्त्यांशी नाते जोडून राम आणि हनुमान इराक ला गेले होते या निर्णयाप्रत येणे जरा असंयुक्तिक वाटते. असेही असू शकते की, प्राचीन काळात व्यापारासाठी त्या प्रांतात गेलेल्या भारतीय लोकांनी हि भित्तिचित्रे कोरलेली असावीत, मात्र आपण कुठलाही निष्कर्ष काढू शकत नाही.

धन्यवाद..!!

Comments

Popular posts from this blog

"शिवाजी महाराज यावे जन्माला, पण आपल्या नाही शेजारच्या घरात."

शिवाजी महाराजांनी कोणत्या चुका केल्या आहेत का? असल्यास पुराव्यासह स्पष्ट कराल का?

संत अमाई माता