रामायण खरंच घडल्याचे काही पुरावे आहेत का? (शब्दशः प्रत्येक काल्पनिक घटना नाही तर युद्ध व राम नामक व्यक्तीबद्दल पुरावे काय आहेत)
हो, रामायण घडल्याचे अनेक पुरावे सापडतात. ह्या उत्तरात मी ते देणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे महाभारताप्रमाणे रामायणातील शहरे आणि वस्तू ह्या उत्खननात शोधणे अवघड असल्यामुळे ते घडले होते हे सिद्ध करण्यासाठी थोडा वेगळा मार्ग अवलंबावा लागतो.
फोटो स्रोत - गूगल
- वाल्मिकी ऋषी आणि राम हे दोघेही समकालीन होते. रामायणामध्ये वाल्मिकींनी असे नमूद केले आहे कि त्यांनी रामायणातील घटनांचा आधी अभ्यास केला आणि नंतर रामायण लिहले. तसेच श्री रामाने त्यागल्यानंतर सीता मातेने काही काळासाठी वाल्मीकींच्या आश्रमामध्ये आश्रय घेतला होता. त्यामुळे तिच्याकडून काही घटनांचा तपशील वाल्मिकींना नक्कीच समजला असेल.
- रामायणामध्ये वाल्मिकींनी रामाच्या मागच्या ७३ पिढ्यांची माहिती अगदी तपशीलवार दिली आहे. तसेच त्यांच्या कुळातील कोणत्या पूर्वजाने कोणाशी लग्न केले ह्याची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. ह्याव्यतिरिक्त सीता मातेच्या पूर्वजांची माहिती पण देण्यात आली आहे. जर वाल्मिकींना एखादी पुराणकथा लिहायची असती तर एवढा तपशील देण्याचा खटाटोप का केला असता? हिंदू धर्म सोडून इतर धर्मातील असे अनेक देव आहेत ज्यांच्या मागच्या पिढ्यांबद्दल काही माहिती सापडत नाही. तरी असून त्यांना देवत्व देण्यात आले आहे आणि त्याला कोणाचा विरोध नसतो मग श्री रामाबद्दल दुजाभाव का?
- हजारो वर्षांपासून रामायण वगळता इतर शेकडो पुस्तकांमध्ये रामाचे आणि रामायणकालीन कथांचे वर्णन करण्यात आले आहे. जर राम आणि रामायणातील इतर व्यक्ती ह्या अस्तित्वात नसल्या असत्या तर इतक्या लेखकांनी त्यांचे वर्णन करायचे का श्रम घेतले असते?
- भारताव्यतिरिक्त श्रीलंका, इंडोनेशिया अशा अनेक देशांमध्ये रामायणाच्या निगडित कथा प्रचलित आहेत. इतकेच नव्हे तर जगातील अनेक ठिकाणांना रामायणातील व्यक्तींची किंवा त्या संबंधित नावे देण्यात आली आहेत. रामायण जर पुराणकथा असती तर इतर देशांमध्ये त्याला इतक्या गंभीरपणे स्वीकारले गेले असते का?
- खगोलशास्त्र (रामायणात वर्णन केलेल्या ग्रहताऱ्यांच्या स्थितीवरून) आणि गणित ह्यांची सांगड घालून काही विद्वानांनी रामायणातील काही प्रसंग कधी घडले त्यांच्या तारखांबद्दल अंदाज लावला आहे. रामाचा जन्म इ. स. पु. ४ डिसेंबर ७३२३ रोजी झाला. राम आणि सीता ह्यांचा विवाह इ. स. पु. ७ एप्रिल ७३०७ रोजी सम्पन्न झाला. रामाचा राज्याभिषेक इ. स. पु. २९ नोव्हेंबर ७३०६ रोजी करण्यात आला. रामायणाचे युद्ध इ. स. पु. ३ ते १५ नोव्हेंबर ७२९२ ह्या कालखंडामध्ये लढले गेले. १५ नोव्हेंबर ७२९२ ह्या दिवशी रावणाचा वध करण्यात आला. तो गुरुवारचा दिवस होता आणि फाल्गुनी अमावस्या होती असे वाल्मिकींनी लिहले आहे. आपण पडताळून बघितले असता असे लक्षात येते कि तो खरोखरच गुरुवारचा दिवस होता.
- रामायणामध्ये वर्णन करण्यात आलेल्या अनेक जागा जशा की अयोध्या, जनकपूर, प्रयाग, चित्रकूट, दंडकारण्य, किष्किंधा आणि पंचवटी अश्या कित्येक जागांना आता पण भेट दिली जाऊ शकते.
रामायणाशी संबंधित काही जागांबद्दल आणि तिथे सापडणाऱ्या पुराव्यांबद्दल माहिती खाली देत आहे.
राम सेतू
हिंदी महासागरात दिमाखाने पसरलेला आणि भारत व श्रीलंका ह्या दोन देशांना जोडणारा राम सेतू हा रामायणासंबंधित सगळ्यात मोठा पुरावा आहे. काही संशोधनानुसार राम सेतू हा मानवनिर्मित आहे आणि अगदी १४ व्या शतकापर्यंत ह्या सेतूवरून चालत जाणे शक्य होते असे काही संशोधकांचे म्हणणे आहे.
रामायणकालीन नागाच्या फणेसारखी दिसणारी गुहा, श्रीलंका
रावणाने सीता मातेचे अपहरण करून ह्या गुहेमध्ये बंदिस्त केले होते असे मानले जाते. ह्याचे पुरावे पण उपलब्ध आहेत. ह्या गुहेमध्ये अनेक शिलालेख आणि भित्तिचित्रे कोरण्यात आली आहेत ज्यामध्ये सीता मातेबद्दल स्पष्ट उल्लेख केलेले आढळून येतो.
हनुमानाच्या पाऊलखुणा
अशोक वाटिकेमध्ये जेव्हा हनुमान सीतेला शोधत शोधत आला होता तेव्हा तो महाकाय रूप घेऊन आला होता असे मानले जाते आणि स्थानिक लोकांची अशी धारणा आहे कि तेथील जंगलामध्ये दिसून येणाऱ्या पाऊलखुणा ह्या दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या नसून खुद्द हनुमानाच्या आहेत.
तरंगणारे दगड
राम सेतू बांधण्यासाठी तरंगणाऱ्या दगडांचा वापर करण्यात आला होता अशी माहिती उपलब्ध आहे. काही वर्षांपूर्वी केरळमध्ये आलेल्या सुनामीदरम्यान असे काही दगड वाहत वाहत किनाऱ्यावर आलेले आढळून आले.
संजीवनी पर्वत
रामायण युद्धादरम्यान लक्ष्मणाला वाचविण्यासाठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला असे म्हटले जाते. द्रोणागिरी पर्वत जेथून उचलण्यात आला होता तेथे अजून पण कापलेला भाग दिसून येतो.
श्रीलंकेत आढळणारी काही विदेशी झाडे
श्रीलंकेच्या काही भागात झाडांच्या अशा काही जाती आढळून येतात ज्या फक्त हिमालयात उपलब्ध आहेत. हनुमानाने पर्वत उचलून नेल्यामुळे त्या झाडांच्या जाती तेथे पसरल्या असण्याची दाट शक्यता आहे.
अशोक वाटिका
हनुमानाने अशोक वाटिकेचा बराचसा भाग जाळून उद्धवस्त केला असला तरी काही भाग वाचला. सध्याचे हकगला बोटॅनिकल गार्डन म्हणजेच प्राचीन अशोक वाटिका असावी असे मानले जाते. स्थानिक लोक त्याला सीथा एलिया असे संबोधितात.
रामायणात वर्णन केलेले चार सुळ्यांचे हत्ती
हनुमान जेव्हा लंकेमध्ये पोचला तेव्हा त्याला तिथे ४ सुळ्यांचे हत्ती पहारा देत असल्याचे आढळले असे वर्णन सुंदरकांडामध्ये करण्यात आले आहे. अशा ४ सुळ्यांच्या हत्तीची जीवाश्मे अनेक ठिकाणे आढळून आली आहेत.
रामायणासंबंधित असे कित्येक पुरावे देता येतील. पण उत्तर खूप लांबत जाईल म्हणून तूर्तास इतकेच लिहतो.
सर्व फोटो गुगलवरून घेण्यात आले आहेत.
धन्यवाद.
✍️संकलन : सुमित रवि सरवदे
स्पष्टपणे सांगायचे तर नाही या बाबत कोणतेही ठोस पुरावे नाहीत.मुळात पुरावा किंवा चिकित्सा हा प्रकार आला की तिथे इतिहास शास्त्र लागू होते व हे शास्त्र पुराव्याच्या आधारेच सिद्ध केले जाते. रामायण व महाभारत यात उल्लेख केलेली शहर अजून ही अस्तित्वात आहेत या वरून ही शहर खूप प्राचीन असल्याचेच सिद्ध होते .प्रत्यक्ष माणसाचे अस्तित्व सिद्ध करणे कठीण गोष्ट आहे .यात केवळ आपण भारता सारख्या मोठ्या खंडप्राय देशात हजारो वर्षांपासून मान्यता असणे हाच याचा पुरावा मानला गेला पाहिजे
इतक्या वर्षांत मोठ मोठ्या दिग्गजांनी याचे इतके पुरावे आपल्याला दिलेत की रामायणाच्या अस्तित्वावर शंका घेणे कठीणच आहे. खरं तर एकदा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या संकल्पनेला आपण देव म्हटलं की आपण फक्त नमस्कार करण्याइतकेच उरतो.
मराठी कोरावर देखील दिग्गजांनी यावर सप्रमाण भाष्य केले आहे. पण, लहानणापासुनच, जेव्हा जेव्हा मी रामायण, महाभारत वाचतो अथवा पाहतो, तेव्हा तेव्हा माझ्या मनात काही प्रश्न उभे राहतात.
इतकी वर्षे ते प्रश्न कोणाला विचारण्याचं धाडस झालं नाही पण इथे बरीच अभ्यासू मंडळी आहेत म्हणून विचारतो.
१. ही वानर मंडळी आता संभाषण करत नाहीत. त्यांनी आपल्या संभाषणकलेचा त्याग का आणि केव्हापासून केला असावा?
२. भूतकाळात घडलेल्या गोष्टींना आपण इतिहास म्हणतो.मग रामायण आणि महाभारत यांना पुराणकथा का म्हणतो?
३. काव्ये असोत वा चारोळी, लिहिणारा आपल्या कल्पनाशक्तीनेच लिहितो. मग रामायणासारख्या ऐतिहासिक घटनांना आपण महाकाव्ये का म्हणतो?
४. आदिकालापासून मानवाला एकच डोके आहे. मग दहा तोंडाचा रावण ही जन्मविकृती की कविकल्पना?
५. विद्वानांच्या म्हणण्यानुसार रामाचा जन्म ख्रिस्तपूर्व ४ डिसेंबर ७३२३ ला झाला असं मानतात आणी रामायण घडले ख्रिस्तपूर्व ९३०० वर्षांपूर्वी. सुमारे २००० वर्षे जगणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाचे जीवनरहस्य काय असेल.
६. इतिहास सांगतो की कापडाचा शोध इजिप्शियन लोकांनी ख्रिस्तपूर्व ५५०० वर्षांपूर्वी लावला. खरं तर हा शोध त्याआधी किमान २००० वर्षे आमच्या देशात लागला. मग आम्ही इतिहासकारांचे ते दावे खोडून का काढत नाही?
७. इतिहासकारांच्या आणखी एका दाव्यानुसार चाकांचा शोध ख्रिस्तपूर्व सुमारे ३५०० वर्षांपूर्वी लागला. पण आमचे रथ तर त्याही आधी सुमारे ३५०० वर्षे धावत होते. ते कसे?
गेली अनेक वर्षे हे प्रश्न माझ्या मनात भेडसावत आहेत. पण आता इथे त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. म्हणून हे आवाहन!
नमोस्तुते !
.............................................................................
मुळातच ज्याला श्रद्धेनी जाणावे ते जर एखादे नाटकातले पात्र आहे असा समज असेल तर त्या दृष्टीने तरी उत्तर तर मी देऊ शकत नाही.
भगवान श्रीराम हे साक्षात परमेश्वरी अवतार होते ही आमची श्रद्धा आहे फक्त ती अंधश्रद्धा अजिबात नाही।
हरी अनंत हरी कथा अनंता ।
कहही सूनही बहू बिधी सब सन्ता । बालकांड
हा दोहा एकच दर्शवतो की श्रीराम जन्म होतो त्यावेळी जी ग्रहांची स्थिती असते ती हजारो वर्षात कधीतरी येत असते हे तर आजही भगवान श्रीरामाची पत्रिका बघून निश्चित करता येईल।
असे रामावतार त्यांच्या मते तर कित्येक झाले दरवेळी काही परिस्थिती बदलली असेल पण भगवान श्रीराम तसेच होते।
एक श्री तुलसीदासजीनी जे लिहिले आहे ते परत सांगतो ..
ब्रह्मदेवांनी सर्व ग्रहांना तसेच सर्व शुभ शकुन याना आज्ञा दिली की आता श्रीरामाची जन्म वेळ आली आहे तुम्ही सगळे आप आपल्या उच्च स्थानी जाऊन बसा नाहीतर तुमचे महत्व संपून जाईल! ही महत्ता आहे श्रीरामाची त्याचे व्यक्ती म्हणून वर्णन करायचा प्रयत्न करणे हे अशक्य आहे आणि ते आपण करू शकतच नाही.
जर एखादे वेळी त्याच रामाने माझी बुद्धी भ्रष्ट केली तर कधी असे होऊ शकते की मी श्रीरामाचे व्यक्ती म्हणून काही वर्णन करीन अन्यथा हे शक्य नाही.तशी इच्छा पण नाही.
- आता सर्वात महत्वाचे हे आहे की असले प्रश्न काय उद्देशाने विचारले जातात हे कळत नाही पण जर astronomy जोतिष्य शास्त्र अभ्यास केला असेल तर जशी श्रीरामाची पत्रिका आहे तशी ग्रह स्थिती साधारण पणे 5 ते 6 हजार वर्षापूर्वी एकदा आली होती हे दिसते त्यावरून काही ..तर ठीक.
- या विषयावर चर्चा होताना दिसते पण खरे तर काल काय झाले हे देखील सिद्ध करताना इतक्या अडचणी आहेत की हे वादतर कधीच न संपणारे आहेत.
- क्रूर आणि अत्याचारी अफझलखान ह्याला शिवाजी महाराजांनी कपटाने मारले असा शोध लावून त्याच्या थडग्या वर दरवर्षी उत्सव करतात. माझी 110 टक्के श्रध्दा आहे की महाराजांनी दगा केला नाही पण ह्या 400 वर्ष पण न झालेल्या घटनेला आज वेगवेगळ्या पद्धतीने अनुमान काढताना का दिसतात कारण श्रद्धा / विश्वास जो , अर्थात आप्त वाक्यावर जो आपण ठेवतो तोच मुख्य स्रोत आहे श्री राऊत यांनी सुंदर माहिती जमा केली तरी शंका त्या आहेतच त्या संपायच्या नाहीत.
- गीतेत भगवान म्हणतात तेच खरे आहे ..
- संशयात्मा विनश्यती
श्रीराम।
.............................................................................
कैकैय नरेश युद्धजित यांच्या विनंतीवरून भरत, प्रभु रामचंद्राचे भाऊ यांनी गंधर्व देशास जिंकुन तिथे तक्षशिला व पुरुकलावती नावाचे शहर बसवलीत अस इतिहास आहे।
ऋग्वेदात गांधार निवासीना "गंधरी" अस संबोधलंय.
तक्षशिला हे त्या काळचे महाविद्यालय होते. इथे ध्यान आणि दंड गुरुकुल पद्धतीने शिकवले जायचे. म्हणजे well educated असा योध्या ही तयार व्हायचा.
इंग्रजांनी भारतातील शिक्षण पद्धती फक्त वेद पाठशाळे वर अवलंबून आहे व इंग्रज,पोर्तुगिस,फ्रेंच किंवा डच असेपर्यंत/ स्थिर होई पर्यंत तरी शिक्षणनाचा दृष्टीनेकोण बदलला पाहिजे असे लॉर्ड Macaulay (मॅक्ले) यांनी लेईस्टर(Leicester) येथील व्याख्यानात "19 व्या शकटकाच्या सुरवातीस भारतिय शिक्षण पद्धतीस चतुराई ने हाताळणे " या विषयावर नुसार बदलली.
त्यामुळे आपणास आपल्या संस्कृतीचा जी उत्तुंग, श्रेष्ठ गुणांनी सुशोभित होती.पावित्राता,त्याग,आनंद,शौर्य,उत्सर्ग, राष्ट्र भक्ती ,ज्ञान, कला , व्यापार, विज्ञान, औषधी ने परिपूर्ण अशी ,जी एका मानवास दुसऱ्या मानवाशी जोडण्याचे (एका आत्माचे दुसऱ्या आत्म्याशी शुद्ध मनसा,वाचा, कर्मींनी) चे सूत्र होती यांचे पुरवावे आपणास शोधावे लागतात.
भारतात 16 महाजांनपदांमध्ये राजकीय रित्या विभागून ही विविध धर्म भाषा,जाती,चाली-रीती असलेली ही माणसे सांस्कृतिक रित्या एकत्र होती। त्यामुळे संपूर्ण भारत वर्षा वर राज्य करणे प्राचीन काळापासून कुणालाही जमले नाही.
आज रोजी ज्ञान वेद, पुस्तके, परदेशी इतिहासकार किंवा लेखक यांच्या भारताशी निगडित असलेल्या दुसर्या च विषयाच्या,साहित्यातील टिप्पणी ची मदत घेऊन आपल्या पूर्वजना शोधावं लागतेय.
गांधार देश म्हणजे महाभारतातील गांधारी ज्या देशाची राजकन्या होती तो देश. सध्या पाकिस्तान चा पाश्चिम व अफगाणिस्तान चा पूर्व भाग म्हणजे गांधार देश.
रामायणातील उत्तरकांड मध्ये गांधार देशाबद्दल लिखाण आहे.
अस म्हटले जाते मत्स्य पुराण 48l6;वायू 99,9 गांधार स्वामींना दृहु चे वंशज मानल्या जात जे ययातिच्या 1)पुरु 2)यदु 3)तुर्वस4)दृहु5) ,अनु या पाच पुत्रांपैकी एक होते. 7200 BC म्हणजे आजपासून 9200 वर्षणपूर्वी या 5 भावांचे संपूर्ण पृथ्वीवर राज्य होते. याना वेदात पंचांनंद असं म्हंटलं जायचं. कैकैय हे गांधार च्या पूर्वेकडील राष्ट्र होय.
यदु पासून यादव, पुरु पासून पौराव, दृहु पासून भोज, तुर्वसू पासून यवन व अनु पासून म्लेंच्छ वंशाची स्थापना झाली.
सांगायचं तात्पर्य अस की अश्या या गांधार देशाला भरताने जिंकले जो रामचंद्रांचा भाऊ आहे, हे एक प्रमाण राम असण्याचे व त्याचा अस्तित्वाने रामायण घडलेले असणार. बाकी रामायणाचे पुरावे तर इतर ठिकाणी आहेतच.
वेळेअभावी इतकेच लिहितेय, अजून सखोल अभयस करून काही पुरावे मिळलायस नक्कीच उत्तरात रामविष्ट करेल.
Lord Macaulay destroyed traditional Indian Educational System : Dr Bedekar
थोडं लॉजिक लावून पाहुयात का?
समजा एक काल्पनिक नाटक किंवा चित्रपट आहे ...आणि कथा तर रामायणपेक्षाही सुपरहिट आहे ... त्यातला नायक सर्व गुणांनी परिपूर्ण आहे. सामर्थ्यवान, चारित्र्यवान, लोकांना (चित्रपटातल्या) तो जणू मसिहाच वाटतो.
तर प्रश्न हा आहे ... त्या नायकाची आपण घरोघरी पूजा का घालत नाही ?
काही वर्षांनी आपण त्या नायकला विसरूनही जाऊ ... कोणाला माहिती आहे १२ व्या शतकातल्या काल्पनिक नाटकातला सर्वोत्कृष्ट नायक ..? आणि माहित असला तरी किती जण त्याला रोज पूजतात..?
...
राम हे ७००० वर्षापूर्वीचे असून देखील ते पूजनीय का आहेत ?
...काल्पनिक नाटक किंवा चित्रपट हे मानवात इतका प्रभाव करू शकत नाहीत.
एका जिवंत व्यक्तीच्या प्रभावाने माणसात बदल होतो . ती व्यक्ती प्रातःस्मरणीय होते.
जिवंत व्यक्तीच्या प्रभावाने माणसात बदल होतो . ती व्यक्ती प्रातःस्मरणीय होते.
हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे कारण भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यांच्यातला सर्वात मोठा फरक म्हणजे पश्चिमेकडे (हिस्टरी) इतिहास हा सनावळ्या नुसार लिहिला जातो आणि आपल्याकडे सनावळ्यांना महत्व नाहीये ,तो गोष्टीच्या स्वरूपात दिला जातो. त्यामुळे काही ठिकाणी त्या गोष्टीला समजून घेण्यासाठी अनेक रंजक उदाहरणे दिलेली असतात. ती त्याचे महत्त्व वाढवण्यासाठी असतात.
हा प्रश्न म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीचा भारतावरील पगडा स्पष्ट करणारा प्रश्न आहे. प्रश्न असा पाहिजे होता की आपण रामायणातून काय शिकलो. रामायण घडले किंवा न घडले यापेक्षा रामायणातून आपल्याला काय शिकता येऊ शकते आणि खरच आपण ते शिकू शकलो का?
थोड्या वेळासाठी विचार करा रामायण घडलेच नाही पण यामुळे या ग्रंथाचे मोल आणि उपयुक्तता कमी होत नाही. या ग्रंथातून आपण काय शिकू शकतो?ते तर राम झाले असतील किंवा नसतील तरी शिकू शकतोच की.
जसे आपण असे समजल्यास की आईन्स्टाईन जन्मलाच नाही तर आइन्स्टाइनने दिलेले सिद्धांत चुकीचे ठरतील का?रामायणाचा इतिहास अभ्यासण्यापेक्षा रामायणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे
......................................................................
अगदी याच आशयाचा एक प्रश्न हिंदी कोरा वर आताच आला होता आणि त्याचे जे उत्तर लिहिले तेच पून्हा मराठीत देत आहे..
रामायण घडले होते का? याचे उत्तर आहे.
हे 100 % हे विधान सत्य आहे.
याची जी वर्णने आपण रामायणात बघतो त्या संबंधित अनेक पुरातन अवशेष आज देखील सर्वत्र भारतात अस्तित्वात आहेत. त्यापैकी काहींची माहिती देत आहे.
मुख्य बाब म्हणजे ही की अश्या या प्रकारे श्रीरामाच्या कथेवर किंवा त्यांच्या अवतार बद्दल शँका घेणे हेच मुळात एक पापच आहे. हे किंवा असले पाप अश्रद्ध असल्याचे लक्षण असल्याने ते आपल्या अध्यात्मिक प्रगतीस अडथळा करणारे आहे. करिता माझ्या पुरते हे उत्तर हे अति बुद्धिवादी जीवासाठीच देत आहे.
श्रद्धाळू लोकांसाठी हे नाही आहे.
आता अस्तित्वात असलेल्या पुरातन स्मरकबद्दल थोडे पाहू ..
- आज ज्या जागी रामजन्मभूमी म्हणून आपण ऐकतो त्या जागी non destructive testing च्य उपकरणांनी चाचणी केल्यावर त्या जागेच्या खाली एक विशाल अशा महाला च्या पाया असल्याचे दिसले आहे. आणि हे हजारो वर्षांपासून तिथेच आहेत.
- दुसरा भाग म्हणजे रामेश्वर येथे जे रामानी स्थापन केले होते ते आज देखील जसे च्य तसेच उभे आहे.
- त्याव्ह मंदिरा समोर एक भारत आणि श्रीलंका याना जोडणारा एक लांब मानव निर्मित समुद्री सेतू आजही अस्तित्वात आहेच.
- तिसरा म्हणजे नाशिकला सीता रामाच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे जसे च्य तसेच आहेत.
- प्रयाग येथे भारद्वाज आश्रम आजही आहे.
- रामटेक येथे रामानी राक्षस मारून त्यांचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली ती जागा आजही आहे.
- श्रीरामा नंतर लवाने स्थापन केलेल्या लाहोर शहराचे अस्तित्व जसे च्या तूझे आहे.
- गांधार देशाचे जे वर्णन रामायणात आहे साधारण पणे तसेच आणि त्याच भागात तो प्रदेश आजही आहे.
- रामायण संबंधित आशा कित्येक जागा आहेत जसे चित्रकूट व तेथील मंदिरे ती विहीर इत्यादी सगळे काही आजही आहे.
- याशिवाय अशा मी वर्णन न केलेल्या हजारो जागा आहेत ज्यांचे अस्तित्व केवळ रामायण हे प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. त्यातील श्रीराम हे साक्षात परमेश्वर आहेत हे तर मी /आपण श्रद्धेने जाणतो ते तसेच राहील.
थोडक्यात अति बुद्धिवादी किंवा अंधश्रद्धा वादी जे आहेत त्यांच्या साठी हे उत्तर लिहिण्याचे कष्ट घेतले आहेत.
श्रद्धाळू लोक तर केवळ श्रद्धेनीच श्रीरामाला जाणतात त्याची अनुभूती घेतात आणि ती तशा जणांना ती येतच राहील .
मला माझ्या पुरता श्रीराम हा साक्षात परमेश्वर आहे हे श्रद्धेनेच जाणणे योग्य वाटते .
श्रीराम।
.............................................................................
वाल्मीकि रामायणावर सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने वाचलेच पाहिजे असे एकमेव पुस्तक म्हणजे :
'रामायणावर नवा प्रकाश'
वाल्मिकी रामायणावरील संशोधनात्मक लेख (FREE ebook available on epustakalay dot com: https://ia801604.us.archive.org/17/items/in.ernet.dli.2015.364986/2015.364986.Raamaayand-aavar-Navaa.pdf)
'रामायणातील संस्कृतिसंघर्ष' (प्रा. अरुण कृष्णाजी कांबळे लिखित) हे पुस्तक सुद्धा खूप महतवाचे आहे!!!
हो. परंतु श्रीरामांची कहाणी वाल्मिकी रामायणा सारखी घडली नाही. ना ती भारतवर्षात घडली. वाल्मिकी रामायण हे दशरथ जटक वर आधारित आहे जे स्वतः Mesopotamian God-King रिम सिन यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ही कथा कदाचित Mesopotamia वरून Indus Valley Civilization मध्ये आली, दंतकथे च्या रूपात प्रसिद्ध राहिली आणि तिथून आज आपल्याला दशरथ जटक, रामायण आणि पौमचरित्र च्या नावांनी ऊपलब्ध आहे. रिम सिन हे कदाचित जगातील पहिले राजे होते ज्यांची पूजा त्यांचे नागरीक करत होते. त्यांचा राज्यकाल तब्बल 70 वर्षे होता ज्याला "Golden Age of Sumer" अर्थातच राम राज्य असे ही म्हंता येईल. ह्याचे अधिक प्रमाण म्हणून श्री रामांशी मिळते-जुळते अति प्राचीन कोरीव काम आपल्याला इराक मध्ये भेटतात.
धन्यवाद. जय श्री राम.
Comparative Analysis of Ram Chandra of Ramayana and Rim-Sin of Mesopotamia-a Follow-up
.............................................................................
एक नुकताच लेख वाचला द्वारका बेटाबद्दल चा.
त्यात हे आढळले की त्या जागी पूर्वी एक विस्तृत शहर होते जे कालानुरूप समुद्र पातळी वर आल्याने लुप्त झाले .
असो त्याजागी समुद्रात सापडलेली अनेक लाकडी किंवा इतर सामान ज्यांची कार्बन डेटिंग च्या पद्धतीने काळ काढता येतो त्या नुसार केलेल्या चाचणीत हे आढळले की ती सर्व नगरी 9 हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होती!!
हे गूगल वर पण वाचता येईल.
तसेच ज्या जागी रामजन्मभूमी ची विवादित जागा आहे तिथे non destructive पद्धतीने पहाणी केली असता एक प्राचीन भव्य राजवाडा असल्याचे सहज दिसते आहे. हा प्रकार तर ASI ने केला होता. जो रामसेतू म्हणून आहे त्याला मानव निर्मित एक सेतू किंवा पूल आहे हे आज सिद्ध झालेले आहे. तो सेतू आणि त्याच्या समोर असलेले शिवमंदिर हे पण प्राचीन आहे. त्याच्या कार्बन डेटिंग झल्याचे माहीत नाही पण तो सेतू पण समुद्राची पातळी ज्या काळी बर्फ वितळून झाली तेंव्हाची अथवा त्या पूर्वीचिंच असावी. कारण तो सेतू आता पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे.
या आणि अशा शेकडो कथा आणि जागा देशात आहेत जिथे रामायण आणि महाभारत घडले होते याचे पुरावे उपलब्ध आहेत.
केवळ हे रामायण एकदाच झाले व अनेकदा दर कल्पात झाले जसे राम चरित मानसात वर्णन आहे ते माहीत नाही. पण रामायणाची कथा अनेक देशात अशींच्या अशीच प्रचलित आहे हे खरे.
भारतात एकदा तर नक्कीच झाली होती. त्याचा काळ फार पूर्वीचा आहे हे पण नक्की. वेदांची रचना देखील फार म्हणजे त्याच्या पण पूर्वीची आहे. कालगणना नक्की केली तर पाश्चात्य विद्वान फार त्रासतात कारण इतकी जुनी ही संस्कृती आहे हे पचवणे जर कठीण जाते. असो.
The Rāma Story and Sanskrit in Ancient Xinjiang
या लेख संबंधित ट्विट चा स्क्रीनशॉट
हा लेख आहे श्री सुभश काक यांनी लिहिलेला. असे अनेक पुरावे आहेत ज्यात रामायण इत्यादी घडले हे सर्वत्र पसरले आणि पौराणिक आस्थे नुसार ते कित्येकदा घडले आहे.
आता श्रद्धा ठेवा तर तो राम लाभेल नाहीतर तुमची मर्जी आहे.
श्रीराम।
.............................................................................
विमानाचे तंत्रज्ञान सहज उपलब्ध नव्हते.
पुष्पक विमान हे विश्वामित्राने कुबेर यांस तयार करून दिले होते. ते रावणाने लंकेसहित बळकावले.
एवढी मोठ्ठी फौज व लवाजमा समुद्रापार नेणे मुळातच कठीण काम.
ज्या अर्थी श्रीरामास समुद्र सेतू बांधावयाची गरज भासली, त्या अर्थी वानरसेनेला हेच तंत्रज्ञान अवगत असावे.
युद्धानंतर विभिषणाने श्रीराम, लक्ष्मण व सीता यांस पुष्पक विमानाने अयोध्येस नेऊन सोडले असेही वाचल्याचे आठवते.
विमानाचे गूढ तंत्रज्ञान श्रीरामाला नंतर मिळाले असावे.
लंके पर्यंतचा सेतू अजूनही अस्तित्वात आहे. त्याला "रामसेतू" असे हिंदू लोक संबोधतात कारण, रामायणात त्याचा स्पष्ट दाखला आहे.
अहिंदू मात्र त्यांस "ऍडम ब्रिज" म्हणून संबोधतात.
ऍडम ने तो सेतू बांधला ह्याचा कुठेही (ऐकीव किंवा लेखी) दाखला नाही
.............................................................................
.............................................................................
.............................................................................
Comments
Post a Comment