महाराजांच्या पराक्रमाला चूक बरोबरच विशेषण लावणं हे "पातकंच"!
महाराजांच्या पराक्रमाला चूक बरोबरच विशेषण लावणं हे "पातकंच"!
त्यांनी जे केलं ते त्यांना बरोबर,योग्य वाटलं म्हणूनच, पण त्याला स्वार्थाचा लवलेशसुद्धा नव्हता. ज्या वेळेस परकीय आक्रमणाखाली अखंड भारत भरडला जात होता त्या वेळेस त्यांनी मूठभर मावळ्यांसोबत या असुरी शक्तींना तोंड द्यायचं ठरवलं यात चूकीच ते काय ? आणि कसे ? सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाऱ्यासारख्या वावरणाऱ्या आणि वाघासारख्या काळजाच्या लोकांमध्ये अस्मितेचं स्फुल्लिंग चेतवणं याचे चुकीत काय मोजमाप करायचे.
आपण आता अखंड धर्मनिरपेक्षता म्हणतो ती ते नसते तर बघायचं सोडाच काय असते तेही कधी माहिती झालं नसत. भारत भू चा भाग असण्याऐवजी आपणही आता त्या हिरव्या कापडावरच्या चंद्रकोरीचे मिंधे झालो असतो.
त्यांनीच तर देव देश आणि धर्म म्हणजे नेमके काय ते नुसतेच सांगितले नाही तर रक्तात एवढे भिनवले की अजूनही आपण "मराठी" गरज पडेल त्यावेळीसच नाही तर अखंड देशहिताचाच विचार करतो.
महाराजांच्या पराक्रमाची महती एवढी की अजूनही भारतभरात महाराष्ट्र ओळखला जातो तो पराक्रमी आणि देव देश धर्माला वाहून घेतलेले लोक म्हणून ही काय कमी आहे की त्याची गोळाबेरीज मांडत बसायचे.
अहो उत्तरेला बघा कितीतरी राजपूत बाटवले गेले इतके की पाकिस्तानच्या मुसलमानांमध्ये अजूनही राजपूत मुसलमान हा एक वर्ग आहे, निदान महाराजांच्या मुळेच आपण आज हिंदुत्वाचा जो घोष चालविलेला आहे तो अस्तित्वात आहे नाहीतर तुम्हाला माहीतच आहे एक प्रसिद्ध कवी काय म्हणून गेला "तो *** होती सबकी"
त्यांनी आपल्याला नुसताच मान दिला नाही एक जीवनपद्धती दिली एक शिकवण दिली एक अस्मिता दिली एक राष्ट्र दिले आणि आपण करंट्यानी ते टिकवायचे सोडून त्यांनी चुका काय केल्या त्याचे "बुद्धिवादी बनून विश्लेषण करणे" म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्यापलीकडे काही एक नाही.
निदान आपण तरी हा कपाळकरंटेपना करायला नको असे माझे स्पष्ट मत आहे.
हो, इतिहास वाचणाऱ्यांना भूतकाळात केल्या गेलेल्या गोष्टींचा उहापोह करणे जरूर सोपे जाते पण मी जे सुचवत आहे ते तुम्हाला करता येते का ते बघा
चार "सुशिक्षित" बरोबर घेऊन आपल्या गल्लीतल्या लोकांना फक्त गल्लीच स्वच्छ ठेवायला उद्युक्त करा.तुम्हाला लवकरच कळेल की ही गोष्ट वाटते तेवढी सोप्पी नाही, याउलट महाराजांनी तर शीर तळहातावर घेऊन लढणाऱ्यांची फौजच उभी केली होती हे काय एव्हडे सोपे आहे ?
महाराजांच्या कृती या फक्त आणि फक्त "पराक्रमच" आणि त्याचा ताळेबंद मांडणे कृतघ्नपणाचं.
आज मी घरात शांतपणे बाप्पाची आरती करतो, महाराष्ट्रात बायकामुलीना मिळणारा मान, त्यांना घराबाहेर निश्चितपणे पडत येणे, सगळ्या धर्माच्या लोकांना त्यांचा धर्म पाळता येणे याचा काय तोटा सांगू ? आणि काय पुरावे देऊ ?
आमच्या अखंड कितीतरी पिढ्या भगव्यामुळेच तर आहेत आणि तो भगवा ज्या "देवामुळे" शाबीतच नाही तर मानाने डौलत राहिला त्याला का म्हणून चूक म्हणू ? आणि काय पुरावे देऊ ?
Comments
Post a Comment