अकबराचा इतिहासात खूप उदो उदो होतो पण आपण जाणतात का ?
अनेक इतिहासकारांनी अकबरची महानता प्रशंसा केली आहे. परंतु अकबरच्या विचित्र स्वभाव विरोधात काही इतिहासकारांनी वर्णन केले आहे. बादशहा अकबर वाईट आकांक्षेने दरवर्षी दररोज दिल्लीमध्ये नौरोज मेळा आयोजित करायचा. आणि त्या मेळाव्यात अकबरने पुरुषांच्या प्रवेशास मनाई केली होती. अकबर या मेळाव्यात महिलांचे वेषभूषा करून जात असे आणि ज्या महिलां मुळे तो तिच्या सौंदर्या ने मंत्रमुग्ध व्हायचा त्या स्त्रीला त्या स्त्रीला त्याच्या नौकराण्या भूल-थापेने अकबराच्या वयक्तिक दरबारात घेऊन जायच्या. आणि मग ती महिला आयुष्यभर अकबराच्या वासनेच्या शिकारी जाऊन तिथेच दासी होऊन जायची.
एक दिवस अश्याच मेळाव्यात महाराणा प्रताप यांची पुतणी म्हणजे लहान भाऊ महाराज शक्तीसिंह यांची कन्या मेळाव्याची सजावट पाहण्यासाठी आलेली असते जिचे नाव बाईसा किरणदेवी असते. किरणबाई चे लग्न बिकानेर च्या पृथ्वीराजजींशी झालेले होते.
बाईसा किरणदेवी चे अमाप सौंदर्य पाहून अकबर स्वतः च्या मनावर ताबा नाही ठेऊ शकला. आणि त्याने काहीच विचार न करता नौकराण्यांच्या माध्यमाने कपटाने जनाना महालात बोलावून घेतले. बाईसा किरणदेवी त्यांच्या जाळ्यात फसून त्या महालात गेली. ज्याप्रमाणे अकबराने बाईसा किरणदेवी ला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, किरणदेवी ने लगेच कंबरेतून कट्यार काढली आणि अकबराला खाली आपटून त्याच्या छातीवर पाय ठेऊन कट्यार त्याच्या मानेवर लावत म्हणाली ,“ नराधम तुला माहीत नाही की मी त्या महाराणा प्रतापांची पुतणी आहे ज्यांच्या नावाने तुला झोप येत नाही, बोल तुझी शेवटची इच्छा काय आहे.” अकबराच्या मानेवरील रक्त सुखले, कधी विचार देखिल केला नसेल की सम्राट अकबर आज एका राजपूत क्षत्रांनीच्या चारणांशी असेल.
अकबर म्हटला, “ माझी ओळखण्यात चुकी झाली, माफ करा मला बाईसा माफ करा,” मग बाईसा म्हणाली की,“आजपासून मेळा लागणार नाही आणि कोणत्याही महिलेला त्रास देणार नाहीस” आणि अकबराने कुढत हात जोडून म्हणाला की,“ खरंच मी आजपासून कोणताही मेळा भरवणार नाही, पण मला जीवनदान द्या.”
तत्पश्चात किरण देवींना शाही थाटातून आपल्या राज्यात परत पाठविण्यात आले होते, कारण इकडे बाईसाचे पती पृथ्वीराज आणि महाराणा यांना देखील वार्ता लागली होती की बाईसा अकबराकडे अडकल्या आहेत, इकडे दोघांचीमिळून सेना सुसज्ज झाली होती…
या प्रसंगांच वर्णन गिरीधर आशिया यांच्या याचना सगत रासो मध्ये ६३२ पान क्रमांकावर वर दिलेले आहे. बिकानेर संग्रहालयात लागलेल्या एका चित्रात सुध्दा या प्रसंगाला एका दोह्याच्या माध्यमातून दिलेले आहे.
किरण सिंहणी सी चढी उर पर खींच कटार
भीख मांगता प्राण की अकबर हाथ पसार
धन्य हो किरण बाईसा त्यांच्या वीरतेला शत शत नमन !
( मुळात प्रश्न आणि त्याला आवश्यक तेवढे उत्तर दिल्यानंतर पूर्ण कथा मांडून वेळ घालवायचा नको म्हणुन कामपुरतेच लिहिलेले होते. )
( प्रस्तुत लेख हिंदीत लिहिला गेला असून खास आपल्या अनुरोधाने मराठीत भाषांतरण केले आहे. त्यासाठी आपला आभार )
Comments
Post a Comment